नरखेड ः गटशिक्षणाधिकारी धवड यांना निवेदन देताना खेडी खुर्द येथील गावकरी.
नरखेड ः गटशिक्षणाधिकारी धवड यांना निवेदन देताना खेडी खुर्द येथील गावकरी. 
विदर्भ

शिक्षक न दिल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर): सध्या नरखेड तालुक्‍यात अनेक शाळेत शिक्षकच नाही. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर अनेक शाळेत अध्यापनाचे सुरू असल्यामुळे मुळ शाळेचेही "तीनतेरा' होत आहे. यात तालुक्‍यातील खेडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश आहे.
सोमवारपर्यंत ( ता. 19) प्रतिनियुक्तीवर पाठविलेले शिक्षक परत आले नाही, तर मंगळवारपासून (ता.20) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.   
नरखेड तालुक्‍यात मोठ्‌या प्रमाणात द्विशिक्षकी शाळा आहे. या ठिकाणी आधीच चार वर्ग व मुख्याध्यापक यांचे कार्य दोन शिक्षक करीत असतात. या शाळेतूनदेखील ज्या शाळेत शिक्षक नाहीत, त्या शाळेत शिक्षक नाही तेथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहे. यामुळे अनेक शाळा या सध्या एका शिक्षकावर सुरू आहेत. खेडी खुर्द येथे जिल्हा परिषदेची वर्ग 1 ते 4 ची शाळा असून 19 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे दोन शिक्षक कार्यरत होते. पण एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या शाळेत पाठविण्यात आल्यामुळे येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. यात ऑनलाइनचे काम, मुख्याध्यापकाचा प्रभार पाहण्यात शिक्षकाचा वेळ निघून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खेडी खुर्द येथील शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते. या शाळेत वर्ग एक ते चारचे एकूण 19 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण येथील एक शिक्षण शाळा सुरु झाली, तेव्हापासून प्रतिनियुक्तीवर शिक्षक दुस-या शाळेत देण्यात आले. यामुळे येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. येथील शाळा व्यस्थापन समिती व गावकर्यांनी अनेक वेळा शिक्षक परत करण्याची मागणी केली होती. पण काहीच होत नसल्यामुळे शुक्रवारी निवेदन देऊन गावक-यांनी गटशिक्षणाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून उपोषणाचा इशारा दिला.  

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT