farmer. 
विदर्भ

चला बघायला वाऱ्यावर डुलणारी हिरवी शेते! इथे सुरू होणार आता कृषी पर्यटन

विनोद इंगोले

नागपूर : सोळा टक्के शेती आणि ७४ टक्के जंगलव्याप्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कृषी पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. त्यासोबतच सुमारे आठ लाख जनावरे असलेल्या या जिल्ह्यात सेंद्रीय शेतमाल उत्पादनासाठी देखील जागृती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

पूर्व विदर्भातील दुर्गम आणि नक्षल प्रवण अशी गडचिरोलीची ओळख. वन आणि जैव विविधतेने समृद्ध असलेल्या या जिल्ह्याला नद्यांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. जिल्ह्यात नद्या असून त्यांची लांबी ९३४ किलोमीटर इतकी आहे. विहिरीच्या माध्यमातून ११ हजार तर प्रकल्पांच्या माध्यमातून २० हजार यानुसार ३१ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.

हमखास पावसाचा जिल्हा असल्याने या जिल्ह्यात दोन लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे एक लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवड होते. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे सोळा टक्के क्षेत्रावर शेती तर उर्वरित १६ टक्के क्षेत्र जंगल व्याप्त आहे. जिल्ह्यातील याच भौगोलिक स्थितीचा फायदा घेत आणि कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

गडचिरोलीपासून दोनशे तीस किलोमीटर तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहर आहे. उपराजधानी नागपूर देखील गडचिरोलीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही मोठी शहर जवळ असल्याने वन आणि कृषी पर्यटनातून या भागात रोजगार निर्मिती होऊन समृद्धी येईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून पहिल्या टप्प्यात चाचपणी केली जात आहे.

सेंद्रीय शेतीमालाचे होणार उत्पादन
दुर्गम भाग असल्याने त्या भागात रासायनिक निविष्ठा खते व कीटकनाशके पोहोचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी देखील रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यल्प करतात. ही बाब हेरत जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. जिल्ह्यात आठ लाख ३४ हजार पशुधन आहे. त्यांच्यापासून मिळणारे शेण आणि गोमूत्र या घटकांचा वापर सेंद्रीय शेतीत करण्याचे प्रस्तावित आहे.

सविस्तर वाचा - मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद; कोणी केले हे वक्तव्य वाचाच

सेंद्रीय शेतीला देखील चालना
जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेत कृषी व पर्यटनाला भरपूर वाव असल्याचे लक्षात आल्याने त्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. जिल्ह्यात पशुधनाची संख्या देखील मोठी आहे. त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या शेण आणि गोमुत्राचा वापर करून सेंद्रीय शेतीला देखील चालना देण्याचे नियोजन आहे.
भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT