शिवनी -अवकाळी पावसाने झालेली गहू पीकाची दुर्दशा.
शिवनी -अवकाळी पावसाने झालेली गहू पीकाची दुर्दशा. 
विदर्भ

नागपूर जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांची तारांबळ

सकाळवृत्तसेवा

नागपूर - जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. कापणीवर असलेल्या गहू व हरभरा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. आंबिया बहरावर असलेल्या संत्रा व मोसंबीसाठीही पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

रामटेक तालुक्‍यातील शिवनी भोंडकी, किरणापूर, भंडारबोडी, हसापूर, महादुला परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू झाली. अर्धा ते  एक तास गारा कोसळल्या. अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह बरसल्याने यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता गार झाला आहे. शेतीपिकांसह घरावरील पत्रे  उडाली व किरणापूर येथे ३०पेक्षा अधिक इलेक्‍ट्रिक खांब तुटले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. गहू, हरभरा, मिरची पीक, भाजीपाला पिकांबरोबर घरावरील पत्रे, गारपिटीने कौले फुटून जोरदार वाऱ्याने विजेचे खांब रस्त्यावर कोसळल्याने अतोनात नुकसान झाले. खरीप हंगामात धान उत्पादक पाण्याअभावी धानपिकांचे नुकसान झाले होते. अशातच अवकाळी पाऊस, गार व वादळवाऱ्यासह हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी रवींद्र बडवाईक, दिनेश बडवाईक, रवी तांबूलकर, महादेव पाटील, राजन श्रावणकर, राजेश वैद्य, योगेश थोटे आदी शेतकरी उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल त्यांच्या शेतातील पिकांचे सर्वेक्षण करून योग्य तो न्याय मिळेल.
- एच. डी. पटले, तालुका कृषी मंडळ अधिकारी, रामटेक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT