Ajit Pawar said Government Medical College to be set up at Parbhani Nashik along with Amravati 
विदर्भ

अमरावतीसह नाशिक, परभणीला होणार शासकीय मेडिकल कॉलेज; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राजू तंतरपाळे

अमरावती : राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय मेडिकल कॉलेज दिल्यानंतर पुढील काही दिवसांत अमरावतीसह नाशिक व परभणी या जिल्ह्यांसाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. आठ) दिली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीसाठी ते अमरावती येथे आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अमरावतीच्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा बाजूला पडला होता. मात्र, आता त्यावर शिक्कामोर्तब करून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भाजप याविषयाचे राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोपसुद्धा अजित पवार यांनी केला.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातील महाविकासआघाडीतील घटक पक्षांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी रस्त्यांवर खिळे लावण्याचा प्रकार देशाने यापूर्वी कधी पाहिला नव्हता, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

राज्यातील सहा महसूल विभागांतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात येऊन त्या जिल्ह्याला प्रोत्साहनपर अनुदान म्हणून अतिरिक्त २५ ते ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

याशिवाय महिला व बालकल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधीची तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके उपस्थित होते.

बेलोरा विमानतळासाठी भरीव निधी

अपूर्णावस्थेत असलेले बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच हे काम पूर्णत्वास येईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT