akola road 
विदर्भ

अकोलेकर खरोखरच सातच्या आत घरात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक संपर्काला ‘ब्रेक’ देत रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कोणतीही शिस्त न पाळण्याची ख्याती असलेल्या अकोलेकरांनी स्वतःच्या व इतरांच्याही सुक्षेसेची काळजी घेत खरोखरच ‘सातच्या आत घरात’चा नियम मात्र तंतोतंत पाळला.त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक आहे तेवढेच नागरिका घराबारेह पडले, तेही संपूर्ण सुरक्षा नियम पाळून.


कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक संपर्काला कुठेतही ब्रेक लागायला हवा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनेताला घराबाहेर न पडता सकाळी 7 ते रात्री 9 वाजता जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. कधीही कोणताही नियम न पाळणारे अकोलेकर या आवाहनाला किती प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता होती. नियम तोडण्यासाठीच असतात अशी ख्याती असलेल्या अकोलेकरांनी रविवारी मात्र शिस्त पाळली. कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी अकोलेकर नागरिकांनी  रविवारी दाखवलेली एकजुट ऐतिसाहिकच म्हणावी लागेल. साकळी 7 वाजतापासूनच रस्त्यावर शुकशुकाट होता. कुणीहा घराबाहेर पडले नाही. अत्यावश्‍यक सेवा सुरळीत होत्या. दवाखाने, औषध विक्रीची दुकाने, डेअरी, व बेकरीची एखाद-दोन दुकाने उघडी होती. हॉटेल व्यावसायिकांनीही जनता कर्फ्युमध्ये सहभागी होत रविवारी कडकोड बंद पाळला. हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी योगेश अग्रवाल यांनी याबाबत हॉटल व्यावसायिकांचे अभिनंदन केले आहे. रविवार सलून व्यावासियाकांसाठी व्यवसायाचा दिवस. मात्र स्वतःसोबतच इतरांच्या सुरक्षेसाठी त्यांनीही जिल्ह्यात कडेकोट बंद पाडून कोरोनाच्या लढ्यात आम्ही सरकारसोबत असल्याचे दाखवून दिले. नाभिक समाज दुकानदार सघंटनेचे जिल्हाध्यक् गजाननि वाघमारे, मोठी उमरी संत सेना महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व  इतर नाभिक समाज संघटनांनी पुढील दिवस बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सलून संचालकांना केले आहे.   


ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यातील सहा तालुका मुख्यालयासह संपूर्ण ग्रामीण भागात जनता कर्फ्यूला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याच्या लढ्यात सहभागी असल्याचे दाखवून दिले. सर्व शुकशुकाट होता. अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या.


एसटीचा ‘चक्काजाम’     
जिल्ह्यात जनता कर्फ्लूला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्या तरी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बाजारेपठा बंद असल्याने बसने प्रवास करणारे प्रवाशीच बाहेर पडले नाही. परिणामी एसटी बस सेवा रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. 


रेल्वेवरही गर्दी ओसरली
कोरोना विषाणूमुळे प्रवाशी संख्या घटल्याने देशभरातील 2400 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यात. लांबपल्याच्या ज्या गाड्या शुक्रवारी रात्री व शनिवारी त्यांच्या आरंभ स्थानावरून प्रवासाला निघाल्यात त्यांच्यावरील प्रवाश्‍यांची गर्दीही ओसरली होती. अकोला रेल्वे स्थानकावर शुकशुकाट होता. किरकोळ प्रवाशीच प्लॅटफार्मवर दिसून आले.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: ट्रम्पच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजार हाहाकार! सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला; नेमकं काय घडलं?

Pimpri Building Collapse: पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; १४ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Latest Marathi News Live Update : इमारतीचा भाग कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Pune: शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला; कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Pandharpur Wari 2026: लाखो लोक पायी पंढरपूरला का जातात? वारी म्हणजे काय अन् वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? इथे वाचा

SCROLL FOR NEXT