shindhi camp 
विदर्भ

सिंधी कॅम्प सिल, दुकानाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचाही शोध

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  सिंध कॅम्प परिसरातील मनपी सिंधी हिंदी शाळा क्रमांक १ जवळ राहणाऱ्या व्यावसायिकाची कोरोना विषाणू कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे महानगरपालिकेच्या सहाय्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कंटेन्मेंट व बफर झोन निश्‍चित करून सिंधी कॅम्प परिसर मुख्य रस्ता वगळा सिल करण्यात आला आहे. याशिवाय या परिसरातील नागरिकांची व व्यावसायीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शौध घेण्याचे काम व त्यांच्या चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत.


महानगरपालिका क्षेत्रात नव्या रुग्णाची नोंद होतात मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी उपविभागीय दंडाधिकारी डॉ.नीलेश अपार व पोलिस निरीक्षक किरण वानखडे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्‍या समवेत सिंधी कॅम्‍प गाठले. परिसराची पाहणी केली व जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे कंटेन्‍मेंट झोन व बफर झोन निश्‍चित करून सील करण्‍यात आले. यावेळी संपूर्ण भागाला सॅनेटायिज करण्‍यासाठी जंतुनाशक फवारणीचे कामाला सुरुवात करण्‍यात आली. सिल केलेल्या भागामध्‍ये मनपा वैद्यकीय चमुव्‍दारे सर्वेक्षण करण्‍यात आले.


जीएमडी मार्केटमधील दुकान-गोदामही सिल
रुग्‍णाचे जी.एम.डी.मार्केट येथे मोठे किराणा दुकान व गोदाम आहे. तेसुध्‍दा सिल करण्‍यात आले. या दुकानाच्‍या माध्‍यमातून या रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या नागरिकांचा सुध्‍दा शोध घेऊन त्‍यांची तपासणी करण्‍याच्‍या सूचना मनपा आयुक्तांनी मनपा कर्मचाऱ्यांना दिल्यात.


सिल केलेल्या क्षेत्रातील नागरिकांची चाचणी
रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या नागरिकांनी व सिल केलेल्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मनपाकडून सर्व्‍हे सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी येणाऱ्या पथकांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आदिंबाबतची माहिती देऊन सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त यांनी केले आहे.

पथकांना माहिती देउन सहकार्य करावे

सिंधी कॅम्‍प येथे राहणाऱ्या एका व्‍यक्तीची कोरोना टेस्‍ट पाझिटिव्‍ह आली. संपूर्ण भागाची पाहणी केली. रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍यांनी व कन्टेंमेन्ट झोनमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांनी सर्व्‍हे करण्‍यासाठी येणाऱ्या पथकांना माहिती देउन सहकार्य करावे व आरोग्य चाचणी करून घ्यावी.
-संजय कापडणीस, आयुक्त, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT