Fertilizer.jpg 
विदर्भ

खबरदार...कोणत्याही परिस्थितीत बी-बियाणे भेटलीच पाहिजेत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करुन द्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी (ता.24) पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीवेळी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्याया बैठकीवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद मुरली इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील सोळंके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक ठोसरे, जिल्हा व्यवस्थापक महाबीज खोकड, मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी मीना, माथाडी कामगार संघ सचिव नालींदे, निरीक्षक माथाडी मोरे, सीएससीआयचे मो. यामिन अन्सारी, कृषी व्यवसायिक संघटना सचिव राऊत आदी उपस्थित होते.

वितरण व्यवस्था 24 तास सुरू ठेवा
निविष्ठांचे उत्पादन केंद्रे, साठवणूक केंद्रे, वाहतूक व जिल्हाअंतर्गत सर्व गावातील कृषी निविष्ठा केंद्रापर्यंत वितरण 24 तास सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. रेल्वे स्टेशनवर आलेल्या खताचे रेक उतरवणे व ट्रकमध्ये खत भरणे यासाठी माथाडी कामगारांना त्यांचे मूळ ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांना व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना घरून किंवा कार्यालयातून येण्या-जाण्याची मुभा देण्याचे निर्देश त्यांनी पोलिस प्रशासनास दिले.

या विषयावर घेतला आढावा
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात अपेक्षित बियाणे पुरवठ्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. बियाण्याची उपलब्धता व व आवश्यकता याचीही तुलना करण्यात आली. रासायनिक खतांचे आवंटन बी.टी. कापूस बियाणे याबाबतही आढावा घेण्यात आला. या संदर्भात सर्व आवश्यकतांनुसार साठा असल्याचे सांगण्यात आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT