Akola Crime 
विदर्भ

Akola Crime : चोरीच्या घटनांमधील सात लाखांचा मुद्देमाल फिर्यादीना परत; राबविण्यात आली विशेष मोहिम

सकाळ डिजिटल टीम

अकोला : पोलिस अधीक्षक यांचे संकल्पनेतून अकोला जिल्हा घटकातील विविध पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत एकूण सात लाख तीन हजार ७८९ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांचे संकल्पनेतून अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याची विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेतून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलिस स्टेशन स्तरावर मोहीम राबविण्याबाबत प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने ता. ३१ मे २०२३ रोजी अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. यात एक लाख ९० हजारांची एकूण सहा वाहने, ९६ हजारांचे सहा मोबाईल व एक सलाख ३६ हजार ४४९ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम आणि दोन लाख ८१ हजार ३४० रुपयांचा इतर मुद्देमाल, असा एकूण सात लाख तीन हजार ७८९ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT