Akola Crop insurance sanctioned but away from farmers, farmers waiting for compensation due to excess rains 
विदर्भ

पीक विमा मंजुर मात्र शेतकऱ्यांपासून दूर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

अकोला   : संकट कुठलेही असो सर्वप्रमथ त्याचा फटका बसतो तो सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच. कोरोनाचा सर्वाधिक परिणामही या घटकावर झाला. त्यापेक्षाही कृत्रीम संकट हे शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. कृषी हंगाम २०१९-२० मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पीक मंजूर होईनही संकटाच्या काळात त्यांना त्याचा आधार मिळालेला नाही.

खरीप हंगाम २०१९-२० मध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची जबाबदारी अग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडे देण्यात आल होती. सोयाबीन, मूग, तूर, उडीद, तीळ, हायब्रिड ज्वारी या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.

पीक हाती येत असतानाच जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सर्व्हे करून झालेल्या नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले. त्यानुसार सोयाबीन व ज्वारी पिकाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला. मूग, उडीद, तूर, तीळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही त्यांना पीक विम्यातून नुकसान भरपाई देण्यात आला नाही. आज कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच नवीन खरीप हंगामाच्या तयारीची चिंता त्याला आहे. असे असतानाही हक्काच्या पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी पीक विमा मंजूर झालेला असतानाही केवळ प्रशासकीय उदासिनतेमुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. हीबाब थेट मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी मुख्यमंत्रांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची विनंती केली आहे. अग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीला आदेश देवून शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याची विनंतही दातकर यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT