workers 
विदर्भ

सूर्योदय ते सूर्यास्त अन्नत्याग...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अंगमेहनती कष्ट करून कुटुंब पोसणाऱ्या मजूर व स्थलांतरित मजुरांच्या प्रश्‍नांकडे समाजाचे, देशाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वोदयी कार्यकर्त्यांनी 1 मे रोजी कामगार दिनाच्या निमित्ताने सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांसह उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे. राज्यांतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. लाॅकडाउनमध्ये ज्या मजुरांना रोजगार बंद ठेवावा लागला त्या सर्वांना त्यांचे थकीत वेतन व देय वेतन मिळण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा बजावणाख्या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे. बांधकाम कामगार व नरेगा मजूर जे सरकारच्या रेकाॅर्डवर आहेत, त्यांचा रोजगार सक्तीने बंद केल्यामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे या काळातील किमान वेतन त्याच्या खात्यात थेट जमा करण्यात यावे. यासाठीचा निधी शासनाकडे आहे. या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारून कामगार विरोधी धोरणे व कायदे करण्यात येऊ नयेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे लाॅकडाउनच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात यावी. लाॅकडाउन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. 


सरकारविरोधी कृती नाही
अन्नत्याग आंदोलन ही कृती सरकार विरोधी नाही, सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले सजग पाऊल आहे. घरीच राहून हे आंदोलन केले जाणार आहे.


15 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग
अन्नत्या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 135 कार्यकर्ते, नेते, अभ्यासक, कलाकार, नाटककार आदींनी सहभाग होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये डाॅ. बाबा आढाव, उल्का महाजन, सुभाष लोमटे, चंदन कुमार, नितीन पवार, मुक्ता श्रीवास्तव, चंद्रकांत चौधरी, संजय शिरसाठ, राजू राणे, केशव वाघ, प्रा . राजू पटेल, पुरुषोत्तम पाटील (गोटू) विजय पाटील, सतीश पाटील, हेमंत पाटील, केशव पाटील, महादेवराव भुईभार, ॲड. रामसिंह राजपुत, वसंतराव केदार, बबनराव कानकिरड आदींचा सहभाग आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT