01Smart village.jpg 
विदर्भ

परिवर्तनातून गावे झाली ‘स्मार्ट’

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील सात गावांची राज्य सरकारच्या ‘स्मार्टग्राम’ योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. या ग्राम पंचायतींमधून बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा ग्राम पंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्राम पंचायतीला 40 लाख व तालुका स्तरावर सुद्धा निवड झाल्यामुळे 10 लाख अशा प्रकारे 50 लाख रुपयांचा निधी पुरस्कार स्वरुपात दिल्या जातो. त्याबरोबर तालुका स्तरावर निवड झालेल्या ग्राम पंचायतींना प्रत्येकी 10-10 लाख रुपयांचा निधी पुरस्कार स्वरुपात देण्यात येतो.

पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधून गावांचाही विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेऐवजी 21 नोव्हेंबर 2016 पासून ‘स्मार्ट ग्राम’ नवी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत तालुका व जिल्हा पातळीवरील गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती व उर्वरीत ग्रामपंचायती अशी विभागणी केली जाते. 

पर्यावरण संतुलित योजनेचे रुपांतर या योजनेत करण्यात आले आहे. योजनेतील निकषही बदलले आहेत. योजनेच्या प्रथम स्तरावर ग्रामपंचायतींनी स्व मूल्यांकन करुन प्रस्ताव सादर करायचे असतात. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून या गावांची तपासणी करण्यात येते. तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत द्वितीय स्पर्धेकरता पात्र ठरते. त्यानंतर सीईओंच्या अध्यक्षतेखालील समिती या ग्रामपंचायतींची तपासणी करते.

तालुका स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख, तर जिल्हा स्तरावर निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना 40 लाखांचे बक्षीस दिले जाते. दरम्यान जिल्हा स्तरावर एक व तालुका स्तरावर सात ग्रामपंचायतींची निवड स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात आली आहे.

या ग्रामपंचायती ठरल्या ‘स्मार्ट’
जिल्हा स्तरावर बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा ग्रामपंचायत स्मार्ट ठरली आहे. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील मनारखेड, पातुर तालुक्यातील गोंधळवाडी, अकोला येथील बोरगाव खुर्द, मूर्तिजापूर-राजनापूर खिणखिनी, अकोट तालुक्यातील पणज व तेल्हारा तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतींची निवड तालुका स्मार्टग्राम म्हणून करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन जखमी, दोन ठार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT