akola farmers Debt on a torn pocket and head, but he is still a donor! 
विदर्भ

फाटका खिसा अन् डोक्यावर कर्ज तरीही तो दाताच! शेतकरी राबतोय मातीत अन् देतोय  सेवा 

अनुप ताले

अकोला  ः कोरोनाने घातलेल्या थैमानात जवळपास सर्वच यंत्रणांची चाके सध्या थांबली आहेत. मात्र, सदैव संकटांचा सामना करणारा शेतकरी कधीच थांबला नाही. उलट न थकता, न घाबरता, स्वतःचे जीवन दावणीवर लावत, सर्वाच्या पोटाची आग विझविण्यासाठी, भूक क्षमविण्यासाठी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. आताही त्याचा खिसा फाटलेलाच, डोक्यावर कर्ज आणि तरी तो मोठ्या हिमतीने खरिपाच्या तयारीला लागला असून, जणू काही प्रत्येकाला आवाहन करीत आहे, तुम्ही घरातच थांबा, आम्ही राबतो मातीत!

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पूर, कधी कीडींचा हल्ला, अशा अनेक संकटांनी शेतकरी सदैव घेरलेला असतो. यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे, त्याच्या कष्टाला कधीच मोल मिळू शकले नाही आणि दिवसरात्र कष्ट उपसूनही त्याच्या झोपडीत अंधारच राहाला. या दृष्ट चक्राने आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करत, त्यांचा बळी घेतला आहे. परंतु, आता हाच शेतकरी संपूर्ण जग संकटात असताना, तारणहार ठरणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव देशात झपाट्याने वाढत असून, दिवसेंदिवस संकट उग्र रुप धारण करत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून लॉकडाउनचे पाऊल उचलत, देशाच्या अर्थचक्राचा कणा समजणाऱ्या विविध यंत्रणांना ब्रेक लावला आहे. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी, सर्वांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. परंतु, शेतकरी थांबला तर, कोणाच्याही जीवनाचे गाडे चालू शकणार नाही. त्यामुळे फक्त शेतकरी सध्या दिवसरात्र शेतात राबत असून, सर्वांच्या जीवनाचा आधार बनला आहे.

घराघरात पोहचवतोय शेतमाल
संचारबंदीमुळे वाहतूक व्यवस्था खोळंबलेली असून, बाजारपेठेतूनही कोरोना प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दैनंदीन लागणारा भाजीपाला, फळे, धान्य कसे मिळवायचे, याचा पेच नागरिकांसमोर निर्माण झाला होता. मात्र हे आव्हाणही शेतकऱ्यांनी पेलले असून, प्रत्येकाला घरोघरी भाजीपाला, शेतमाल पोहविण्याची सेवा तो नित्याने देत आहे. महत्त्वाचे म्हणजे एरव्ही त्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव देणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट दाम वसूल करण्याची संधी असताना, एकही पैसा अधिक न आकारता, केवळ बाजारमुल्य घेऊन, तो शेतमाल पोहचवित आहे.

शेतकऱ्यांवर सदैव अन्याय होत आला, त्यांची लूट करण्यात आली, नकारात्मक धोरणाचे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवण्यात आले. परंतु, सर्वात मोठ्या दानशुराची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. आताही कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प पडली असून, स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्वजण घरात बसले आहेत. मात्र, शेतकऱ्यांने दातृत्वाचे काम सोडले नाही. इतरांना जीवन देण्यासाठी तो, दिवस-रात्र कष्ट उपसत आहे. तेव्हा आता तरी त्याच्यातील बळीराजा जाणून घेतला पाहिजे, त्याच्या डोक्यावरील नकारात्मक धोरणाचे पाऊल काढले पाहिजे.
- मनोज तायडे, शेतकरी, कौलखेड जहांगीर, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT