Akola Fighting between two families due to prejudice, both the son and the father in the fatal attack ... 
विदर्भ

पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, प्राणघातक हल्ल्यात मुलगा आणि वडील दोघेही...

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : सिव्हिल लाइन पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या खरप येथे सोमवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान पूर्व वैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये क्षीरसागर बापलेकावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघेही ठार झाले. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


खरप येथे क्षीरसागर व इंगळे कुटुंबीय शेजारी शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. सोमवारी रात्री   दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी इंगळे भावंडांनी पिता सनातन व मुलगा विजय क्षीरसागर यांच्यावर कुदडीने वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पिता पुत्राचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सिविल लाइन पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलिसांनी तिघे भावंडांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.  रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


खरप येथील रहिवासी तसेच वेल्डिंगचा व्यवसाय करणारे विजय क्षीरसागर आणि सनातन क्षीरसागर याच परिसरातील एका चौकात सोमवारी रात्री उभे असताना त्यांच्यावर खरब येथील रहिवासी आकाश इंगळे, धम्मपाल इंगळे आणि जयपाल इंगळे या तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडल्यानंतर परिसरात शांतता असल्याने या दोघांचेही मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होते. त्यानंतर गोपनीय माहिती द्वारे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ तसेच सिव्हिल लाईन्स पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

तसेच विजय शिरसागर आणि सनातन शिरसागर यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.  हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT