akola hospital will get four ventilators 
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळणार चार व्हेंटिलेटर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू देशासह राज्यात सुद्धा पोहचल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वाढीव व्हेंटिलेटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामळे सर्वोपचार रुग्णालयात 14 व्हेंटीलेटरमध्ये नवीन चार व्हेंटीलेटरची भर पडणार आहे. हे नवीन चार व्हेंटीलेटर रुग्णसेवेच्या मदतीला  लवकरच असणार आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सध्यस्थितीत 14 व्हेंटिलेटर असून, त्यातील 2 कोरोना आयसोलेशन वार्डात राखीव केले आहेत. त्यात आणखी चार व्हेंटिलेटरची भर पडणार आहे. यामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर व अकोट यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर मिळणार असल्याची माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात प्रस्ताव पाठविला असून, आठ दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण होऊन व्हेंटिलेटर मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एक कोटींचा निधी कोरोनाची गंभीरता बघता वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी आला असल्याचे सांगून लवकरच व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असल्याची महिती दिली.

खासगी रुग्णालयात आठ बेड आरक्षित
जिल्ह्यात सध्यस्थितीत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. मात्र, भविष्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याकरिता शहरातील दोन हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी चार बेडची व्यवस्था व्हेंटिलेटरसह करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT