akola lockdown ration shop closed 25th shop owner punnished
akola lockdown ration shop closed 25th shop owner punnished 
विदर्भ

संचारबंदीत राशन धान्य वाटपतील अनियमितता भोवली, विदर्भातील तब्बल एवढ्या राशन दुकानदारांवर गुन्हे दाखल

विवेक मेतकर

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. अशातच रोज कमाई करणाऱ्यांचेही हाल होत आहेत.काहींना तर जीवनावश्यक वस्तू कशा विकत घ्याव्या हाही प्रश्न पडला आहे. अशातच राशन दुकानाचा मोठा आधार सर्वसामन्यांना आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाऊनच्या काळात विदर्भातील तब्बल 25 राशन दुकानदारांनी धान्य वाटपात केलेली अनियमितता भोवली असून त्यांच्यावर गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या आठवड्याभरापूर्वीच विदर्भातील 25 राशन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अनेक दुकानांचे परवाने सुध्दा रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये रविवारपर्यंत (ता.19) नागपूर विभागात एकूण पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून 18 राशन दुकानांचे निलंबन तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11 दुकानांवर निलंबित करण्याची कारवाई तर वर्धा जिल्ह्यात चार दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची कारवाई नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याच कालावधीत अमरावती विभागात एकूण पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून सात राशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर 13 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक सर्वाधिक दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून वाशीम जिल्ह्यात पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात चार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी दोन गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आले असून बुलडाणा जिल्ह्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT