Akola Many have gone abroad because the passport service was closed.
Akola Many have gone abroad because the passport service was closed. 
विदर्भ

कोरोना इफेक्ट ः अनेकांची भंगली विदेशवारी, कारण ही सेवा करण्यात आली बंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः लॉकडाउनमुळे गेल्या साठ दिवसांपासून पासपोर्ट अपॉइंटमेंटची प्रक्रिया बंद आहे. सरकारी आदेशाचे अकोल्यातही पालन केले जात असून, मागील दोन महिन्यापासून अकोल्यात एकही नवा पासपोर्ट तयार करण्यात आला नाही.

लाॅकडाउनमुळे अनेकांच्या विदेशवारीचे स्वप्न भंगले असून, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी गडया आपला गावच बरा असे म्हणणे पसंत केले आहे.


देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. पासपोर्ट कार्यालयांचे अंतर्गत काम सुरू असले, तरी पासपोर्ट अपॉटइंटमेंट थांबविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या पुढील सूचनांनुसार पासपोर्ट मंत्रालयाच्या वेबसाइटवर 31 मे पर्यंत पासपोर्ट सेवा केंद बंद राहणार आहेत. त्यानंतरच लोकांनी पासपोर्टच्या अपॉइंटमेंट घ्याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे;

पण देशभरातील ऑरेंज आणि ग्रीन झोन वर्गात येणाऱ्या सर्व शहरातील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आता सुरू होणार होती मात्र अद्यापही तसा निर्णय झाला नाही. तरी पुढील काही काळात तसा निर्णय होण्याची शक्यता आहे.

अनेकांचे नियोजन कोलमडले
आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सध्या बंद असला, तरी अनेकांच्या पासपोर्टच्या नुतनीकरणाच्या तारखा जवळ आल्या आहेत, तर काहींच्या उलटून गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पासपोर्ट काढायचे होते. मात्र, लॉकडाउनमुळे नागरिकांचे नियोजन कोलमडले आहेत. नागरिक पासपोर्ट अपाइंटमेंट प्रक्रिया कधी सुरू होणार, याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या आठवड्यात सरकारने करोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशी शहरांची विभागणी केली आहे. मात्र पासपोर्ट बाबत कुठलाही निर्णय झाला निर्णया झाला नसल्याची माहिती आहे.

महिन्या काढले जायाचे पाचे ते सहा हजार पासपोर्ट
अकोल्यात कोरोना आधी महिन्याला पाच ते सहा हजार पासपोर्ट काढले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, मागील दोन महिन्यापासून एकही पासपोर्ट काढला नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT