Akola-Medical Exam postponed 
विदर्भ

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

शुभम बायस्कार

अकोला : कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहोरात्र परीश्रम घेतले जात आहे. अशातच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी दिली. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एस्सी कोर्स आदी अभ्यासक्रामांची परीक्षा या १२  मे २०२० पासून पुढे सुरु करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पदव्युतर पदवीच्या विद्यार्थ्यांची रुग्णसेवेसाठी मदत घेतली जात असल्याने मार्डचे अध्यक्ष डॉ. राहूल वाघ व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना व विद्यापीठाला यासंदर्भात निवेदन दिले होते. 

याबाबत डी.एन.बी. व इतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया तसेच सद्य परिस्थिती  लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानूसार  मे -२०२० उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पेपर-१ हा १५ जून २०२०, पेपर-२ हा १७ जून, पेपर-३  हा १९ जून आणि पेपर-४ हा २२ जून रोजी सकाळी ११  ते दु.  २ या वेळेत निश्चित करुन देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. 

तसेच सत्र-२ च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विद्यापीठात विना विलंब शुल्कासहीत सादर करणेसाठी ५ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ मे २०२० आणि अति विलंब शुल्कासहीत  १२  मे २०२० पर्यंत विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सप्निन तोरणे यांनी कळविले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

Pune Adhik Maas Darshan Yatra : अधिक मासनिमित्त ST ची भाविकांना पर्वणी; पुणे विभागाकडून गणपतीपुळेसह तुळजापूर-गाणगापूर विशेष पॅकेज टूर सेवा सुरू

Video : नंदिनीचा खोटेपणा होणार आईसमोर उघड! मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही चक्रावले

Solapur: ZP अध्यक्षांना २० हजार, सभापतींना १२ हजार मानधन; पदाधिकाऱ्यांच्या प्रवास भत्ता अन् इंधनासाठी लाखोंची तरतूद

SCROLL FOR NEXT