Akola News Senior BJP MLA Govardhan Sharma passed away knp94 
विदर्भ

Akola News: भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सहावेळा निवडून आलेले भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक जानेवारी 1949 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे जन्मलेले शर्मा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम 1995 मध्ये निवडून आले होते.

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काही काळासाठी मंत्री म्हणूनही कामकाज बघितले होते. 2019 च्या निवडणुकीत ते विधानसभेमध्ये निवडून आले होते. श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील एकमेव नेते होते.

उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी राज्यभरातील नेते उपस्थित राहतील. गोवर्धन शर्मा यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT