school result 
विदर्भ

शाळांना आता निकालाचे ‘टेन्शन’

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पहिली ते नववी व अकारावीची वार्षिक वर्षिका रद्द करण्यात आली. त्याऐवजी वार्षिक मूल्यमापनाच्या आधारावर निकाल लावून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षकांना शाळेत जाण्याची सुविधा नाही. त्यामुळे मूल्यमापन घरूनच घरून घ्यावे लागणार असल्याने शाळांना निकालाचे ‘टेन्शन’ आले.


राज्यासह संपूर्ण देशात ऐन परीक्षेच्या काळातच कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला. त्यामुळे विषाणू संसर्ग टाळण्यासाठी १४ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली. विषाणूचा संसर्ग वाढतच गेल्याने अखेर पहिली ते नववी व अकरावीची परीक्षाच रद्द करण्याची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शाळांना विद्यार्थ्यांचे निकाल लावावेच लागणार आहे. त्यासाठी वार्षिक मूल्यमापण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


असे होईल मूल्यमापन
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करताना त्यांच्या चार घटक चाचण्या व प्रथमसत्रातील परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून वार्षिक निकाल लावला जाणार आहे. त्याआधारावरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिले जातील. वार्षिक निकालाचे मूल्यमापन करताना आकारिक मूल्यमापन निश्‍तिच करून त्यानुसार विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी व श्रेणी निश्‍चित केली जाणार आहे. याशिवाय कला, कार्यानूभव व शारीरिक शिक्षणाचे 100 पैकी गूण देवून टक्केवारीनुसार श्रेणी निश्‍चित केली जाणार आहे. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आकारिक मूल्यमापनाची पद्धत नसल्याने त्यांचा निकाल हा वर्षभरातील घटक चाचणी व प्रथम सत्रातील निकालाच्या सरासरीवर आधारीत राहणार आहे.

आकारिक मूल्यमापन
शिक्षण संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करून निकाल देत पुढच्या वर्गात प्रवेश द्यावयाचे आहेत. त्यासाठी आवश्‍यक ते निर्देश शाळांना देण्यात आले आहे. नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे वर्षभरातील परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर सरासरी गुण निश्‍चित करून द्यावयाचे आहेत. त्या आधारावरच पुढच्या वर्गातील प्रवेश निश्‍चित होईल.
- समाधान डुकरे, प्राचार्य, डायट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT