amc 
विदर्भ

अकोला महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती कोण होणार?

मनोज भिवगडे

अकोला : महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या 29 फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन सभापतींची निवड केली जाणार असून, त्यासाठी सत्ताधारी भापजमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे आठ सदस्यही या महिन्याअखेरीस स्थायी समितीतून निवृत्त होतील. त्यांच्या जागी येणाऱ्या नवीन सदस्यांपैकी एकाला स्थायी समिती सभापतीची संधी मिळणार आहे.


अकोला महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे आठ सदस्य निवृत्त होऊन त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड केली जाते. ही निवड प्रक्रिया फेब्रुवारीच्या मध्यातच पूर्ण होणे अपेक्षित आहे. या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याकरिता 15 फेब्रुवारीनंतर विशेष महासभा बोलाविल्या जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपकडून दोन तर इतर पक्षांकडून सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने एकाच वर्षासाठी स्थायी समिती सदस्य पद दिले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून आता कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.


हे सदस्य होणार निवृत्त
सभापती विनोद मापारी यांचा सभापतीपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळासोबतच स्थायी समितीतील दोन वर्षांचा कार्यकाळही पूर्ण होत आहे. त्यामुळे ते समितीतून बाहेर होतील. याशिवाय विद्यमान महापौर अर्चना मैसने यासुद्धा स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने तेही समितीतून बाहेर पडतील. याशिवाय भाजपचे नंदा पाटील आणि अनिल गरड यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. भारिप-बमसंच्या धनश्री देव यासुद्धा समितीतून निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे फय्याज खान अब्दुल खान, काँग्रेसच्या जैनबी शेख इब्राहिम आणि शिवसेनेचे मंगेश काळे यांना प्रत्येकी एका वर्षासाठी समितीत स्थान देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून नवीन सदस्याची नियुक्ती केली जाईल.


यांचे सदस्यत्व राहणार कायम
भाजपचे गटनेते राहुल देशमुख, हरीश काळे, दीपाली जगताप, अनिता चौधरी यांच्यासह शिवसेनेचे गजानन चव्हाण, अपक्ष माधुरी मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे फिरोज खान अब्दुल खान यांचे सदस्यत्व आणखी एक वर्षासाठी कायम राहणार आहे.


चौथे सभापतीपद कुणाला?
स्थायी समितीचे चौथे सभापती कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समितीमध्ये कायम राहणाऱ्या सदस्यांपैकी भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांना सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या पत्नी नगरसेविका सुनिता अग्रवाल यांना स्थायी समितीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याही सभापतीपदाच्या शर्यतीत राहतील. महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली. त्यावेळी स्थायी समितीचे पहिले सभापती म्हणून बाळा टाले यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर विशाल इंगळे यांच्याकडे सभापतीपद सोपविण्यात आले. तिसरे व विद्यमान सभापती विनोद मापारी आहेत. त्याच्या जागेवर चौथे सभापतीपद कुणाच्या वाट्याला येते याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT