akola washim temptation of money, Lakshmi's house was burnt in Shivara 
विदर्भ

अरेरे! पैशाच्या मोहात घरची लक्ष्मी जाळली शिवारात

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : घराच्या लक्ष्मीने घराला घरपण येते. हुंडा हुंडाबळी विसाव्या शतकात असतील असा विश्वासही कोणी ठेवणार नाही. मात्र वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील   चिंचोली येथे पैशासाठी पत्नीला शिवारात नेवून जाळून टाकल्याची दुर्दवी घटना उघडकीस आली आहे. माणसाचं माणूसपण पैशासाठी किती निच होते हे या घटनेने अधोरेखित झाले आहे.

 सासरच्या मंडळीने विवाहितेकडे पैशाची मागणी करून तिची हत्या केली. तसेच पुरावा नष्ठ करण्याच्या दृष्टीने मृतदेह जाळला. ही घटना तालुक्यातील आसेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या नांदगाव शेतशिवारात उघडकीस आली. लक्ष्मी उर्फ कामिनी प्रमोद भोयर असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी मृतक महिलेचा पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयाजी भोयर (दोघे रा. आसेगाव) तसेच गजानन बंडू भोयर (रा.चिंचोली) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृतक महिलेची मावशी शांताबाई विठ्ठल खडसे (वय48) रा. देवठाणा, ता. जि. वाशीम यांनी आसेगाव पोलिसांत रविवारी (ता.7) फिर्याद दिली की, मृतक लक्ष्मी उर्फ कामिनी हिच्याशी तिचा पती प्रमोद भोयर हा तिच्या नावावर जमा असलेले पाच लाख रुपये घेण्यासाठी भांडण करून तिला त्रास देत होता. तिने पैसे न दिल्यामुळे प्रमोद भोयरसह इतरांनी संगनमत करून तिला ठार मारले. तसेच मृतदेह जाळून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी पती प्रमोद तुळशीराम भोयर, तुळशीराम कोयोजी भोयर (दोन्ही रा. आसेगाव), तसेच गजानन बंडू भोयर (रा. चिंचोली) या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आसेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडारे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT