file photo 
विदर्भ

फुटली नाही मिशी न विकतोय दारूची शिशी! या जिल्ह्यात दारूतस्करी जोमात

दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन असल्याने कोरपना तालुक्‍याला जोडणाऱ्या तेलंगणा व यवतमाळ जिल्ह्यालगतच्या सर्व सीमा बंद असल्याने वाहने व नागरिक विनापरवानगी प्रवेश करू शकत नाही. शासनाने नुकतेच दारूदुकाने उघडी करताच जिल्ह्यातील दारूतस्करांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

गडचांदूर पोलिस उपविभागात रात्रीही काय, आता तर दिवसाही बेधडक दारूतस्करी सुरू असल्याने परिसरात लॉकडाउनमध्येही दारूचा महापूर आहे. पोलिस प्रशासनाचा वचक नाही. सूचनापत्रावर तत्काळ जामीन मिळतो. यात अर्थपूर्ण संबंध असतो. यामुळे गडचांदूर पोलिस उपविभागात अवैध दारूविक्री जोरात आहे. अल्पावधीत पैसे कमविण्याच्या नादात परिसरातील तरुण वर्ग अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात गुंतला आहे. यात काही अल्पवयीन मुलेही असल्याने 'फुटली नाही मिशी न विकतोय दारूची शिशी' असे दारूबंदीचे विदारक वास्तव्य जिल्हाभर आहे.

सध्या जिल्ह्यातील दारूबंदी हटणार, अशी चर्चा असल्याने अवैध दारूतस्करीचा धंदा बंद होण्याच्या भीतीने कमाई करून घेण्याची लगबग आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दारू कोण पुरवितो, याचा ठावठिकाणा असूनही कारवाई मात्र हस्तकांवरच केली जाते. मागील पाच वर्षांत अनेक दारूतस्करांवर गुन्हे नोंदविले गेले. दारूसाठा जप्त करूनही कायद्याच्या किचकट डावपेचांमुळे गुन्हेगार दोषमुक्त होतो. शिक्षाच होणारच नाही, याची कल्पना असल्याने पाच वर्षे होऊनही दारूबंदी झाली नाही. शेवटी जिल्ह्यातील दारूबंदी उठणार असल्याचे भाकीत मद्यप्रेमींना असून, बेरोजगार झालेले परवानाधारकही मोठ्या आतुरतेने सरकार दारूबंदी कधी उठविणार, याकडे लक्ष देऊन आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Smriti Mandhana Wedding: खरंच ही स्मृती मानधनाची लग्नपत्रिका आहे? सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दिल्याची घटना, ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस

Pune News : खडकी कॅंटोन्मेंट एकत्र महापालिकेत येणार का; विलीनीकरणाची वाट अजूनही अडखळलेली!

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा: त्र्यंबकेश्‍वरवरील ताण कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जव्हार, मोखाडा आणि सापुतारा भागात टेंट सिटी उभारण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT