file photo
file photo 
विदर्भ

अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षा एकाच टप्प्यात

सकाळवृत्तसेवा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षा एकाच टप्प्यात घेण्यात येत आहेत. त्यामुळे वेळापत्रकही चुकले असून परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था कोलमडली आहे. एकाच बाकावर जास्त विद्यार्थी बसविण्याची वेळ केंद्रप्रमुखांवर आली आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागले. परीक्षा वेळापत्रक बदलविताना ते चुकले आणि विद्यापीठाच्या सर्व परीक्षा एकाच टप्प्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर वाढलेली विद्यार्थिसंख्या पाहता एकाच बाकावर तीन ते चार विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्राधिकाऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर त्यांचे रोलनंबर दिसत नव्हते. यामुळे विद्यार्थी अधिकच गोंधळून गेले. परिणामी बऱ्याच केंद्रांवर पेपर एक तास उशिरा सुरू करावा लागला. या सर्व बाबींचा फटका मूल्यांकन केंद्रालाही बसला आहे. पेपर संपल्याबरोबर संबंधित विषयाचे गठ्ठे मूल्यांकन केंद्रावर येऊन धडकतात. मूल्यांकन केंद्रावर पहिलेच माणसांची कमी आहे. अशात जॉबवर्करचा अघोषित संप सुरू होता. विद्यार्थिसंख्या वाढल्याने गठ्ठ्यांची संख्या वाढली आणि ते सर्व गठ्ठे आल्यानंतर त्यांना ठेवायला जागाही कमी पडली. ही संपूर्ण परिस्थिती परीक्षा संचालक व त्यांच्या चमूला हाताळण्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागले. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास निकाल 45 दिवसांच्या आत लागतील याची शक्‍यता कमीच आहे. ज्या शाखांच्या परीक्षा जूनमध्ये होणार आहेत, त्या परीक्षांचे निकाल लावण्यासाठी परीक्षा विभागाची कसोटीच लागणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या निकालाला वेळ लागल्यास विद्यार्थ्यांनी पुढल्या सत्रात प्रवेश घ्यायचा कसा? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT