jawahar novodya vidyalay 
विदर्भ

कोरोनामुळे नवोदयाचे हजारो विद्यार्थी कुटुंबापासून दूर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात रेल्वे, विमान व सार्वजनिक बस सेवेसह खासगी वाहतुकही बंद आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही देशभरातील 70 नवोदय विद्यालयात 4232 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या शिक्षणासोबत आरोग्य व खाण्यापिण्याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय मानवसंसाधन मंत्रालयाने दिले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये विदर्भातील 28 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


नवोदय विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कोरोना विषाणूमुळे देशभातील 70 विद्यालात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 192 विद्यार्थी आहेत. प्रवाशाची कुठलीही व्यवस्था नसल्याने आणि सर्वच राज्यांनी त्यांच्या सीमा इतर राज्यातील नागरिकांसाठी बंद केल्या असल्याने हे विद्यार्थी उन्हाळी सुटीतही अडकून पडले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीतही शाळेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यांचे शिक्षण योग्य प्रकारे सुरू राहिल आणि त्यांच्या जेवणाची कोणताही आबाळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित विद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.


केंद्रीय राज्य मंत्र्यांनी साधला संवाद
लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील 192 विद्यार्थी अडकून पडले आहेत. हे विद्यार्थी देशभरातील विविध राज्यातील 70 विद्यालयात आहेत. येथील प्राचार्यांसोबत केंद्रीय मानसंसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संपर्क केला. या विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या पालकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता यावा म्हणून सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी प्राचार्यांना दिले. त्यांची जेवणाची नीट व्यवस्था करण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी सूचना केली.


महाराष्ट्रातून विद्यार्थी इतर राज्यात पाठविले
लॉकडाउन झाल्यानंतर संपूर्ण देशात प्रवासाला बंदी करण्यात आली होती. या काळात मिळालेल्या सवलतीत महाराष्ट्रातील बहुतांश नवोदय विद्यालयात शिकत असलेले इतर राज्यातील विद्यार्थी त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र इतर राज्यातील नवोदय विद्यालय प्रशासनाने ही दक्षता न घेतल्याने महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवरही नवोदय विद्यालयात अडकून पडले आहेत.

विद्यालय प्रशासनातर्फे योग्य ती काळजी
देशभरातील 70 नवोदय विद्यालयातील प्राचार्यांसोबत संवाद साधून तेथे अडकून बसलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे मनोबल वाढविले. विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास बघून कौतुक वाटले. पालकांना विद्यार्थ्यांची काळजी वाटणे सहाजिक आहे. मात्र त्यांच्या पाल्याची विद्यालय प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेतली जात आहे.
- संजय धोत्रे, केंद्रीय मानसंसाधन राज्यमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT