विदर्भ

मेडिकलमधील सर्व "एक्‍स रे' मशीन बंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे काढण्याचा सल्ला येथील डॉक्‍टर देतात. परंतु, मेडिकलच्या क्ष-किरण विभागातील सारेच एक्‍स रे यंत्र बंद असल्यामुळे गरीब रुग्णांचा जीव जाण्याची वेळ आली आहे.
मेडिकलच्या एक्‍स-रे विभागात कधीकाळी चार यंत्र होते. परंतु, दर दिवसाला सुमारे पाचशेवर एक्‍स रे काढले जातात. दिवसा पाठविण्यात आलेल्या रुग्णांचा एक्‍स रे काढण्यासाठी तब्बल पाच तासांची प्रतीक्षा करावी लागते. ही बाब वारंवार मेडिकल प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आल्यानंतरही एक्‍स-रे विभागात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. दोन हजार रुग्णांची नोंद दर दिवसाला होत असताना पाचशे रुग्णांना एक्‍स रे काढण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे एक्‍स रे चे महत्त्व ओळखून यंत्राची संख्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, एक्‍स रे काढण्यासाठी जीवघेणी प्रतीक्षा रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना करावी लागत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले. बुधवारी (ता.25) एकमेव सुरू असलेले एक्‍स रेदेखील बंद पडले आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभाग, कॅज्युअल्टी तसेच वॉर्डातून आवश्‍यक रुग्णाला एक्‍स रे ची गरज असल्यास पाठवण्यात येते. सकाळीपासूनच मेडिकलच्या एक्‍स रे विभागासमोर गर्दी वाढते. अत्यावस्थेतील रुग्णांना प्राथमिकता देत त्यांचे एक्‍स रे लवकर काढण्याची गरज आहे. मात्र, रांगेत उभे राहून रुग्ण किंवा नातेवाईक थकून गेल्यानंतरही एक्‍स रे काढला जात नाही. आता एक्‍स रे मशीनच बंद पडले. यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT