maha vikas aaghad 
विदर्भ

माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर थेट आरोप! वाचा नेमके काय म्हणाले

अतुल मेहेरे

नागपूर : महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांकरिता आणि शेतकऱ्यांच्या मदतीकरिता काढलेल्या जीआरचे वर्णन काळा जीआर असे करावे लागेल, तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, विदर्भावर अन्याय करणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विदर्भाकडे अजिबात लक्ष नाही, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. या जीआरची त्यांनी आज होळी केली.

शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी करावयाच्या उपाययोजनांच्या मागणीचे निवेदन त्यांनी आज विभागीय आयुक्तांना दिले. आम्ही सर्वांनी मागणी केली होती की, ५० हजार रुपये हेक्टरी सोयाबीन, कापूस, धान, आणि मिरची पिकाला अनुदान द्यावे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे आणि सरकारने केवळ १६.४८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये केवळ साडेसहा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झाला आणि साडेसहा हजार रुपयांत त्याने स्वतःला, कुटुंबाला कसे सावरावे, हे सरकारनेच आता सांगावे, असे बावनकुळे म्हणाले.

संत्र्याचा पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या काटोल, नरखेड भागातली मोसंबी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. १८ - १८ लाख रुपयांचे बगीचे १० हजार रुपयांत घ्यायला कुणी तयार नाही. अशा परिस्थितीत विदर्भाकडे कुणाचेच लक्ष नाही. जो जीआर काढला, त्यामध्ये सानुग्रह अनुदान नाही. आजच्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना खावटी मिळालेली नाही. घराच्या बांधकामाचे अडीच लाख रुपये लोकांना मिळाले नाही. अजूनही पूरग्रस्त भागातील सर्वस्व गमावलेले लोक अंगणवाड्या आणि समाजमंदिरांमध्ये राहत आहेत. १० हजार परिवारांचे प्रचंड हाल होत आहेत.

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने अतिरेक केला आहे. नागपूरसह विदर्भाकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. सरकार झोपलेले आहे. भयाण परिस्थितीमुळे लोक आत्महत्या करीत आहेत, याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आज विभागीय कार्यालयात केलेल्या आंदोलनात आमदार गिरीश व्यास आणि आमदार समीर मेघे उपस्थित होते.


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा दुधगाव-खोची बंधारा खुला

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT