SYSTEM
विदर्भ

नियुक्तीसाठी रुग्णवाहिकाचालकांचा विष घेण्याचा, आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

भंडारा-गोंदिया : प्राथमिक आरोग्य केंद्रासह आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी रुग्णवाहिकाचालकांनी आरोग्य विभागात कायम नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनात भंडारा येथे एका चालकाने विष घेण्याचा, तर गोंदिया येथे चालकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

रुग्णवाहिका चालकांचे कंत्राट भोपाळ येथील कंपनीकडे होते. ३० जुलैला कंपनीचे कंत्राट संपल्यामुळे त्याच्यासोबत अनेक चालक रस्त्यावर आले आहेत. शिवाय, कंत्राटदार कंपनीकडून मिळणारे अपुरे मानधन, सुट्या, विमा व इतर सुविधा मिळत नसल्याने हे चालक एनआरएचएमअंतर्गत नियुक्ती करण्याची मागणी करत होते. मागणीसाठी सोमवारी (ता. २) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात चर्चा होती.

अशाच एका रुग्णवाहिकेवर १६ वर्षांपासून कंत्राटी चालक म्हणून कार्यरत असलेला जितेंद्र डोंगरे हा चर्चेत उपस्थित होता. बैठकीत कोणताही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने जितेंद्रने खिशातून उंदीर मारण्याचे विष काढून खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून विषाची पुडी हिसकावली. त्यानंतर त्याची समजूत काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. चालकाने कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात विष घेतल्याने कार्यालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

आत्मदहनाचा प्रयत्न

याच मागण्यांसाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोरही रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास आंदोलकांनी आंदोलनस्थळी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलक रुग्णवाहिकाचालकांना अटक करून नंतर सुटका केली. त्याचप्रमाणे आंदोलकांनी जि. प. समोरील बायपास मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT