File photo
File photo 
विदर्भ

"झुंड'साठी अमिताभ बच्चन नागपुरात!

सकाळवृत्तसेवा

नागपूर  : झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात मुक्कामी असणार आहे. नोव्हेंबरमध्ये हे चित्रीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे नागपुरातील चित्रीकरणासाठी अमिताभ यांना काही दिवस मुक्काम करावा लागणार आहे. यापूर्वी त्यांच्या कुठल्याच चित्रपटाचे चित्रीकरण नागपुरात झालेले नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या मुख्य भूमिकेत असतील. शूटिंग ऑगस्टमध्येच सुरू होणार होते. मात्र, आता नोव्हेंबरचा मुहूर्त निघाला आहे. मोहननगर येथील सेंट जॉन्स हायस्कूल, लोणारा आणि प्रा. बारसे यांच्या सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूलजवळील घरी चित्रीकरण होणार आहे. नागराज मंजुळे काही दिवसांपूर्वी नागपूरला येऊन गेले. त्यावेळी त्यांनी शूटिंगसाठी सेंट जॉन्स हायस्कूलच्या प्राचार्यांची परवानगी मागितल्याची माहिती स्वत: प्रा. बारसे यांनी "सकाळ'ला दिली. एकूण शूटिंग तीन महिन्यांचे असून, त्यातील 45 दिवस नागपुरात होणार आहे. याचदरम्यान अमिताभ नागपूक मुक्कामी असतील.
आणि शुटींग झालेच नाही !
ज्योती स्वरुप यांच्या "परवाना' चित्रपटाच्या शुटींगसाठी 1969मध्ये अमिताभ बच्चन तीन दिवस नागपुरात मुक्कामाने होते. पहिल्या दिवशीच लोकेशन्स पसंत न पडल्याने ज्योती स्वरुप यांच्यासह संपूर्ण टीम मुंबईला परतली होती, मात्र अमिताभ बच्चन नागपुरात फिरण्यासाठी दोन दिवस श्‍याम हॉटेलमध्येच थांबले होते. दुर्दैवाने या चित्रपटाचे शुटींग नागपुरात झाले नाही. मुख्य म्हणजे त्यावेळच्या नागपूर मुक्कामात अमिताभ "सूपरस्टार' म्हणून उदयास आलेले नव्हते. आज 2018 मध्ये महानायक म्हणून लौकीक प्राप्त करणारे अमिताभ यांची एक झलक बघण्यासाठी सारा देश आतूर असतो. अशा परिस्थितीत "झुंड'च्या निमित्ताने त्यांचा नागपूर मुक्काम सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT