अमरावती : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालक तसेच शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मात्र मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील जवळपास 80 ते 85 हजार विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनु. जाती-जमाती संवर्गातील मुले तसेच दारिद्रयरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्याची शासनाची योजना आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना प्रती गणवेश 300 रुपये या दराने दोन गणवेश संचाकरिता 600 रुपये प्रति विद्यार्थी अशी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास 80 हजार विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहे. गणवेश खरेदी देयकांची अदायगी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला धनादेशाद्बारे करावी लागणार आहे.
सविस्तर वाचा - इस चम्पी मे बडे बडे गुन
अशी आहे लाभार्थ्यांची संख्या
अमरावती
अनु.जाती, जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील मुले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.