file photo 
विदर्भ

अमरावतीत एका आमदारासह 25 जण कोरोनाबाधित...आरोग्य यंत्रणा सतर्क

सुधीर भारती

अमरावती : कोरोना विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात शनिवार(ता. 11)पासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे; मात्र आज सकाळीच तब्बल 25 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या सोबतच एका आमदाराचा अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदारांचे थ्रोट स्वॅब येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णलयाच्या लॅबमध्ये तपासण्यात आले होते. त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे रुग्णालयाचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी सांगितले.

विविध भागांत आढळले कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, अमरावतीत शनिवारी 25 कोरोनाबाधित आढळून आले. अकोट येथील 45 वर्षीय महिला, मांगीलाल प्लॉट येथील 52 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, अकोट येथील 17 वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील 36 वर्षीय पुरुष, सिद्देश्वरी सोसायटी येथील 78 वर्षीय पुरुष, सातरगाव येथील 30 वर्षीय महिला, राजापेठच्या बजरंग टेकडी येथील 63 वर्षीय महिला, शेगाव नाका येथील 38 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, परतवाड्याच्या सायमा कॉलनी येथील 20 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 16 व 14 वर्षांचा मुलगा, बडनेरा येथील जुनीवस्ती भागातील 42 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, शेगाव नाका येथील 12 वर्षीय मुलगा, कांतानगर येथील 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालक, अशोकनगर येथील 27 वर्षीय महिला, 70 व 25 वर्षीय पुरुष, अकोट येथील 12 वर्षीय मुलगी व 22 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आजवर 820 कोरोना बाधित

एकाच दिवशी अनेक जण कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. आरोग्य यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे. सर्व 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने आता अमरावती जिल्ह्याचा आकडा 820 वर पोहोचला आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

India Test Squad vs NZ: भारताच्या कसोटी संघात महत्त्वाचा बदल! कुलदीप यादव OUT, वन डे गाजवणारा गोलंदाज IN; पण, नेमकं काय घडलं?

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी लोकलचा जम्बो ब्लॉक; मध्य, हार्बरसह ट्रान्सहार्बर सेवेवर परिणाम

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित

कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल; सोनिया गांधींसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट , नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT