Eklavya Residential School Sakal
विदर्भ

Eklavya Residential School : पोहे खाल्ल्याने ३४ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

एकलव्य निवासी शाळेतील प्रकार : अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील परसापुर येथील एकलव्य रेसिडेन्शियल शाळेतील ३४ विद्यार्थ्यांची प्रकृती आज नाश्ता केल्यावर अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

एकलव्य रेसिडेन्शियल शाळा चिखलदरा येथून स्थलांतरित झाली असून ही शाळा सध्या अचलपूर तालुक्यातील परसापूर येथे सुरू आहे. या ठिकाणी सुमारे ३३४ विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासह आदी आवश्यक सुविधांचा अभाव असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची ओरड सातत्याने होत होती. आज गुरुवारी (ता. २७) सकाळी या शाळेतील विद्यार्थ्यांना नाश्त्यात पोहे देण्यात आले. नाश्ता झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ सारखी लक्षणे दिसून आली.

शाळेच्या व्यवस्थापकाने या विद्यार्थ्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोके दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि पोट दुखणे असा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. असे शाळा प्रशासन व आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत ही शाळा चालविला जाते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व जेवणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र तरीही या विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण दिल्या जात नसल्याचा आरोप होत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मी दोन दिवसांआधी एकलव्य शाळेवर भेट दिली होती. त्यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी मुलांना गैरसोय होत आहे, जेवण बरोबर देण्यात येत नाही, अभ्यासाची सोय नाही. मुलांची गैरसोय होत आहे, असे दिसून आले. आज २५ मुले उपजिल्हा रुग्णालयात भरती आहेत. या प्रकरणी दोषींवर विधानसभेत कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे.

- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट.

उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थी उपचारासाठी दाखल झाले असून याची संपूर्ण चौकशी करून वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल सादर करणार.

- आर. आर. साखरकर, शिक्षण विस्तार अधिकारी, प्रकल्प कार्यालय, धारणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Latest Marathi News Live Update : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

Kalamnuri Nagar Parishad Election : मतांसाठी आता लक्ष जातीवर; उमेदवारांकडून अखेरचे डावपेच, प्रचारासाठी तीनच दिवस

Honour Killing : प्रेयसीनं घरी बोलावलं अन् तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराचे हात-पाय बांधून गोळ्या झाडून केली निर्दयीपणे हत्या

SCROLL FOR NEXT