abduction of girls esakal
विदर्भ

Amravati Crime : चार अल्पवयीन मुलींचे अपहरण; फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : ग्रामीण भागातून तीन तर शहरातून एक, अशा चार मुलींचे अपहरण झाले. नांदगावखंडेश्वर, माहुली जहाँगीर व येवदा ठाण्याच्या हद्दीतून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले.

नांदगावहद्दीत आजीकडे राहणारी मुलगी किराणा दुकानातून येत असल्याचे सांगून घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार पालकांनी केली. नांदगावखंडेश्वर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. माहुली पोलिस ठाण्यांतर्गत शेंदोळाखुर्द गावात आईवडील बाहेरगावी गेले असताना अल्पवयीन मुलीला संशयित आकाश मोहोड याने फूस लावून पळवून नेले, असा आरोप अपहृत मुलीच्या पालकांनी केला.

माहुली पोलिसांनी संशयित आकाशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. येवदा ठाण्याच्या हद्दीत तेलखेडा गावातून युवती संगणक क्लासचे कारण सांगून घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही. तिला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी येवदा पोलिसांत नोंदविली आहे.

शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून मुलीचे संशयित सुमित खडसे याने अपहरण केले, असा आरोप अपहृत मुलीच्या पालकांनी तक्रारीत केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून संशयित सुमितविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar landslide : घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू; ५-६ घरांवर दरड, अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! सोलापूर-पुणे हायवेवरील ६० मीटर अंतरातील ढाबे, हॉटेल ६ महिन्यांत हटणार; ‘एनएचएआय’कडून नोटिसा, ६ महिन्यांत ४२६ जणांचा अपघाती मृत्यू, वाचा...

Dahi-Paneer Kebab: पोटही भरेल, चवही खुलून येईल! कमी तुपात बनवा कुरकुरीत दही-पनीर कबाब; नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT