crime 
विदर्भ

Crime News : चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीचे अपहरण

चांदूर रेल्वे शहरातील घटना : पिडीत व आरोपीच्या शोधार्थ पोलीस रवाना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती:- चाकूच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना चांदूर रेल्वे शहरात बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे शहर हादरले आहे. याप्रकरणी पीडित व आरोपीच्या शोधार्थ चांदूर रेल्वे पोलिसांचे पथक ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात रवाना झाले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरेपी नईम खान, शेख अशफाक, अतुल कुसराम व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे चौघे विना नंबरच्या तवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कूटूंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवीत मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसवून घेऊन गेले. या घटनेमुळे सदर परिवार भयभीत झाला होता.

त्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ४५२, ५०६, ३४ तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अनिल पवार करीत आहे. याप्रकरणी पिडीत व आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले होते. या घटनेनंतर पोलीस स्टेशनवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT