Amravati underpass crime 
विदर्भ

Amravati Crime: अमरावती हादरलं! दिवसा-ढवळ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, आरोपी पळत असताना ऑटो चालकाने पकडलं अन्...

Amravati Crime minor girl was stabbed: अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मधील बुधवारी सकाळी 8.30 ची ही घटना आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कार्तिक पुजारी

Amravati Crime News: अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या चाकूहल्ला करण्यात आला आहे. अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मधील बुधवारी सकाळी 8.30 ची ही घटना आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायी चालत निङाली होती. ती जात असतांना मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने गळ्यावर चाकूने वार केला आहे. यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर वार करून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऑटो चालकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर पोलिसांना फोन करण्यात आला. राजपेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.

एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकू हल्ला करण्यात आल्याचं कळतंय. चाकू हल्ला केल्याने मुलीच्या गळ्याला 6 टाके पडले आहेत. 24 वर्षीय प्रफुल काळकर नामक आरोपीने हे काम केल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपी युवक सातत्याने मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती आहे. आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

माहितीनुसार, याआधी सुद्धा आई-वडिलांनी त्या आरोपीची पोलिसात तक्रार केली होती,त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर अमरावतीच्या राजपेठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी यासंदर्भात अधिक माहिती देणे टाळलं आहे. मात्र, सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, महिलांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या उरणमध्ये एक २२ वर्षीय मुलीची हत्या केल्याचं प्रकरण ताजं आहे. आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जारी; ९.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित

IND vs NZ: इशानची एन्ट्री, वैभव सूर्यवंशी पुन्हा बाकावर! भुवनेश्वर कुमारही OUT, श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केले धडाधड बदल

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया अडकणार लग्नबंधनात? नात्याची कबुली देत म्हणाली...

Cyclone Arnab: अर्नब चक्रीवादळानंतर आंध्रात आता 'राजकीय वादळ'; सरकारवर काय होतोय आरोप?

Marathi News Live Updates : टोरेंट कंपनीच्या विरोधात २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची हाक

SCROLL FOR NEXT