girls mobile shooting
girls mobile shooting sakal
विदर्भ

Amravati Crime : कपडे बदलताना मोबाईलने चित्रीकरण करणाऱ्यास चोपले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - अंजनगावसुर्जी येथील एका मंगल कार्यालयामध्ये मुली कपडे बदलत असताना एका युवकाने मोबाईलने चित्रीकरण केल्याची बाब उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. सदर युवकास पकडून जमावाने चांगलेच चोपले.

मोहंमद फुजेल मोहंमद शौकत (वय २३), असे मुली कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या युवकाचे नाव असल्याचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले. बुधवारी (ता. सात) रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. सदर मंगल कार्यालयात लग्नसमारंभात सहभागी असलेल्यांपैकी काही मुली कपडे बदलण्याकरिता गेल्या होत्या. त्याची चाहूल संशयित मोहंमद फुजेल याला लागली. त्याने कार्यालयाच्या खिडकीतून मोबाईलने व्हिडिओ तयार केला.

तो व्हिडिओ तयार करीत असल्याची कुणकूण आतील काही जणींना लागल्याने हा गैरप्रकार उघडकीस आला. मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसांनी संशयित मोहंमद फुजेल मो. शौकतविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मो. फुजेल याला अंजनगावसुर्जी पोलिसांनी गुरुवारी (ता. आठ) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली, असे अंजनगावसुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले.

ज्या युवकाने मुलींचे कपडे बदलताना चित्रीकरण केले, तो त्या लग्नात सहभागी असलेल्यांपैकी नाही. गैरकृत्य करणाऱ्या युवकाकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे.

- दीपक वानखडे, ठाणेदार, अंजनगावसुर्जी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT