In Amravati, if more than 50 people stay together to beware of corona, a fine of Rs 500 per person will be levied. 
विदर्भ

कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त लोकं बोलवाल तर मग

सुधीर भारती

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच अमरावतीकर मात्र निर्धास्त असल्याचे दिसून येत असल्याने बेफिकीर लोकांवर प्रशासनाने शिकंजा कसला आहे.
 
मंगल कार्यालयांमध्ये 500 ते एक हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ, निवडणूक मेळावे घेतले जात आहेत. मात्र आता जिल्हा प्रशासनाने अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये लग्न समारंभातील उपस्थिती, मास्क न घालणाऱ्यांवर दंड, प्रभावी कार्यवाही आदी बाबींचा समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे सभा, लग्न समारंभामध्ये 50 पेक्षा अधिक लोक राहिल्यास प्रतिव्यक्ती 500 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे.
 
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच शहरात मात्र सर्वत्र बेफिकीरी दिसून येत आहे. मंगल कार्यालये, लॉनमध्ये एक एक हजार लोक उपस्थित राहत आहेत. जेवणावळ्या बिनधास्तपणे दिल्या जात आहेत. प्रमुख चौकातील फेरीवाले, ऑटोरिक्षा चालक विनामास्क आपला व्यवसाय करीत आहेत. या सर्वांवर 26 पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. त्यासाठी विशेष पथकांची मदत घेण्यात येणार आहे. ज्या मंगल कार्यालयात, सभागृहात किंवा लॉनमध्ये निर्धारित नियमानुसार 50 पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय चालकास प्रतिव्यक्‍ती 500 रुपयांप्रमाणे दंड आकारल्या जाणार आहे. 

कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता बेफिकीर राहून चालणार नाही. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड व त्यानंतर पुन्हा आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मास्क न घालणारे फेरीवाले, ऑटोरिक्षावाल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

प्रशासनाला खरी माहिती द्या

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लग्न समारंभात 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. लग्न समारंभ, रिसप्शन यासाठी सुद्धा परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. किमान प्रशासनाला त्याची लेखी माहिती तरी देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Pune Crime: पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग अन् अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

SCROLL FOR NEXT