dinesh bub, balwant wankhede and navneet rana sakal
विदर्भ

Amravati Lok Sabha Election Result : नवनीत राणांची प्रतिष्ठा पणाला

कडूंच्या ‘प्रहार’मुळे भाजप-काँग्रेस टांगणीवर

सकाळ वृत्तसेवा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळविला होता. पण, वाऱ्याची दिशा बदलताच राणा यांनी दोन्ही काँग्रेसच्या मतदारांना लाथाडत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. असे असले तरी राणा दांपत्याचे युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच होते.

पण, केवळ स्वाभिमानच्या बळावर लोकसभा जिंकणे सोपे नव्हते. काँग्रेस आघाडीत हा मतदारसंघ रिपाइंच्या वाट्याला येत असल्याने निकालाचे काँग्रेसला काही घेणेदेणे नसायचे. त्यामुळे शिवसेनेचा पराभव करण्याची संधी आघाडीपुढे चालून आली आणि ती नवनीत राणांच्या माध्यमातून पूर्ण झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप वेगळे झाले.

भाजपला जोर अजमावण्याची संधी चालून आली. लोकसभेत विविध मुद्यांवर झालेल्या चर्चेत नवनीत राणा यांनी भाजपची तळी उचलून धरली. तसेच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी थेट मातोश्रीला आव्हान दिले. आपला हिंदुत्त्वाचा माथा अधिक उजळ व्हावा यासाठी मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठन करीत सर्वांचे लक्ष वेधले होते. महायुतीत अमरावतीची जागा एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी तर उद्‍धव ठाकरे यांनी काँग्रेससाठी सोडली. भाजपला नवनीत राणा यांच्या रूपाने आयता उमेदवार मिळाला.

भाजप, काँग्रेसची हवा टाईट

अमरावतीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असल्याचे चित्र असले तरी प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश बूब मैदानात उतरल्याने काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे आणि नवनीत राणा यांची हवा टाईट झाली आहे. कारण, बूब हे काँग्रेसची मते खातात की भाजपची हे गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT