Rajapeth Police Station sakal
विदर्भ

Amravati News : नवनीत राणा यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा; काँग्रेसची राजापेठ ठाण्यात तक्रार

लोकसभा क्षेत्रामध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अमरावती शहर काँग्रेसने केला.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जहिराबाद लोकसभा क्षेत्रामध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अमरावती शहर काँग्रेसने केला. नवनीत राणा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस ठेण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

राजापेठ ठाण्यात शनिवारी (ता. ११) ही तक्रार दाखल करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पोलिसांत ही तक्रार दाखल केली. यावेळी मुन्ना राठोड, समीर जवंजाळ, वैभव देशमुख आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांची भेट घेऊन नवनीत राणा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी भाजप उमेदवार बी. बी. पाटील यांच्या प्रचारसभेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते, असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तान वेगळा देश असल्यामुळे त्या देशाचे नाव काँग्रेससोबत जोडणे म्हणजे पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासारखे असल्याची बाब पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. राजकीय स्वार्थासाठी तसेच प्रसिद्धीसाठी त्यांनी देशाचा अपमान केल्याचा आरोपही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त यांनाही तक्रारीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT