amravati municipality to allow farmers to deliever vegitables door to door 
विदर्भ

अमरावतीकरांना मिळेल "डोअर टू डोअर' भाजीपाला, अशी आहे महापालिकेची योजना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधातून भाजीपाल्याचा पुरवठा थोडा शिथिल करण्यात आला आहे.  नागरिकांना भाजीपाला मिळू शकणार आहे, मात्र तो शेतकरी ते ग्राहक व डोअर टू डोअर या माध्यमातून. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे विक्रेत्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रभागनिहाय वाहनांची व्यवस्था करण्याची योजना आहे.

शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रणासाठी कठोर निर्णय घेत निर्बंध लागू केले. भाजीपाल्याची किरकोळ विक्रीसह ठोक बाजार बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला मिळणे कठीण झाले असतानाच नाशवंत असलेला शेतकऱ्यांचा भाजीपाला वाया जाऊ लागला. याचा लाभ काही साठेबाजांनी उचलून शिल्लक भाजीपाला बेभाव विकण्यास सुरूवात केली होती.

या अडचणीतून मात करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना मांडण्यात आली, त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरी देण्यात आली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहे. मात्र त्यासाठी अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधिकारी व बाजार समितीकडून दाखला घ्यावा लागणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाकडून विक्री परवाना घेऊन निर्धारित करून दिलेल्या प्रभागात विक्री करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पासेस दिल्या जाणार असून त्यावर त्यांचे नाव, मार्ग व भ्रमणध्वनी राहणार आहे. विक्रेत्या शेतकऱ्यांना त्यासाठी छोट्या चारचाकी वाहनांची व्यवस्था करावी लागणार आहे. महापालिकेने त्यासाठी बाजार समितीमधील घाऊक व्यापाऱ्यांना वाहन उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे, असे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आधी आपला भाजीपाला महापालिकेने तयार केलेल्या ग्राहकनगर मध्ये आणायचा आहे. तेथून तो निर्धारित प्रभागांत विक्रीसाठी नेता येणार आहे. एका प्रभागांत किमान सहा वाहन सोडण्याची योजना आहे. महापालिकेच्या या योजनेमुळे नागरिकांना भाजीपाला मिळू शकण्यासोबतच शेतकऱ्यांचा भाजीपाला विकल्या जाऊ शकणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने फार काळ शेतकऱ्यांना तो घरात साठवून ठेवता येणार नसल्याने हा मार्ग शोधण्यात आल्याचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सांगितले.

इच्छुकांना आवाहन

ज्या शेतकऱ्यांना अमरावती शहरात भाजीपाला विकायचा आहे व वाहनांची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाकडे नाव नोंदवावे, असे आवाहन बाजार व परवाना विभागाचे सहायक आयुक्त श्रीकांत चौहान यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT