Amravati Murder for not paying for liquor 
विदर्भ

भाजीपाला आणण्यासाठी निघाले रात्री; मात्र, दारूच्या दुकानासमोर नकार देणे पडला महागात

संतोष ताकपिरे

अमरावती : दारू पिण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने चिडलेल्या तिघांनी मिळून एकाचा खून केला. मंगळवारी (ता. १) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सुधाकर भीमराव भुरमुंदे (वय ४३, रा. शिरसगावकसबा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास सुधाकर भुरमुंदे हे भाजीपाला आणण्यासाठी जात होते. गावातील जयस्वाल यांच्या देशी दारूच्या दुकानाजवळ तिघांनी सुधाकर भुरमुंदे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिघांनी त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली.

यानंतर सदानंद ज्ञानेश्वर धाकडे, विजय हकीम मंडलिया यांनी भुरमुंदे यांना पकडून ठेवले. तर आकाश प्रकाश धाकडे याने चाकूने सपासप वार केले, असा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी सुधाकर भुरमुंदे यांना उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

श्रीकृष्ण भुरमुंदे यांच्या तक्रारीवरून आकाश, विजय व सदानंद या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन तिघांनाही चोवीस तासात अटक करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज सुरवाडे यांनी सांगितले. तिघांनाही गुरुवारी (ता. तीन) डिसेंबरला न्यायालयासमोर उपस्थित केले जाईल. उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

Shah Rukh Khan vs Salman Khan: शाहरुख की सलमान कोण आहे संपत्तीत वरचढ, एकाकडे मन्नत, दुसऱ्याकडे माउंटन व्ह्यू! पैशाचा बादशाह कोण?

SCROLL FOR NEXT