File photo
File photo 
विदर्भ

धाकट्याने दिली थोरल्या भावाला "किडनी'

सकाळवृत्तसेवा

अमरावती : मोर्शी तालुक्‍यातील धानोरा येथील रहिवासी संदीप आहाके (वय 30) यांनी आपल्या मोठ्या भावाला मूत्रपिंड (किडनी) देऊन जीवनदान दिले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी विभागातील ही तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
योगेश गोकुलराव आहाके (वय 36) हे मागील सहा महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होता. किडनी प्रत्यारोपणासंदर्भात डॉक्‍टरांनी त्यांना सुचविले. लहान भाऊ संदीप हा किडनी दान करण्यास योग्य असल्याचे विविध चाचण्याअंती समजले. दरम्यान, तपासणीनंतर मंगळवारी (ता. 25) योगेश्‍वर शस्त्रक्रिया करून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता डॉ. मनी, श्रीगिरीवार, अध्यक्ष डॉ. स्नेहल कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारुकी या समितीच्या मान्यतेनंतर ही शस्त्रक्रिया झाली. जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्‍यामसुंदर निकम, रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. टी. बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया झाली.
नागपूरचे किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजय कोलते, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. प्रणित घोनमोडे, प्रतिभा अंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडीले, ज्योती काळे, रितू बैस, डॉ. सोनाली चौधरी, नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर, डॉ. मीनल चव्हाण, प्रकाश येणकर, माला सुरपाम, आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुसे, जमुना मावसकर, शुभांगी टिंगणे, नम्रता दामले, अशोक किनवटकर, अमोल वाडेकर, विनोद पाटील, प्रफुल्ल निमकर आदींनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT