amravti news  sakal
विदर्भ

Amravati News : आदिवासी महिलेची विहिरीत ढकलून हत्या

संशयित गौरव हटवार हा देखील त्याच शेतात मजुरी करीत होता. त्यातून त्यांचे सुत जुळले.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर गावातील एका शेतात मजुरी करणाऱ्या महिलेचा त्याच गावातील युवकाने विहीरीत ढकलून खून केला. बुधवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

बसंती इवने असे हत्या झालेल्या नाव आहे. गौरव प्रकाश हटवार असे हत्या करणाऱ्या संशयित युवकाचे नाव आहे. बसंती ही मध्यप्रदेशातील मालेगाव येथील रहिवासी असून, ती काही दिवसापासून पांढरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या शेतात राहुन मजुरी करायची.

त्यातुन तिचा व मुलाचा उदरनिर्वाह व्हायचा. संशयित गौरव हटवार हा देखील त्याच शेतात मजुरी करीत होता. त्यातून त्यांचे सुत जुळले. ५ सप्टेंबर रोजी बसंती ही, शेतातील गोठ्यात रात्रीच्या वेळी झोपली होती.

संशयित गौरव याने तिला मारहाण करून विहिरीत ढकलून जीवे मारले. त्यानंतर संशयित गौरव हा पसार झाला. महिलेच्या दहा वर्षाच्या मुलाने हा घटनाक्रम डोळ्यांनी बघितला.

त्याने शेतमालक यांना फोन करून घटनेची माहिती दिली. शेतमालक दाभाडे यांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांना कळवले. आदिवासी महिलेला मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत बाहेर काढून पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवीला.हत्येचे कारण समजु शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT