Amravati ambadevi 
विदर्भ

हे अंबादेवी, कोरोनाचे संकट जगावरून लवकर जाऊ दे, उंबऱ्यावर भाविक टेकवतात माथा 

सुधीर भारती

अमरावती : सध्या जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून देश तसेच राज्यात लॉकडाउन सुरू आहे. अशाही स्थितीत महिषासुरमर्दिनी श्रीअंबादेवी व एकवीरा मातेची नित्योपासना सुरूच असून कोरोनाचे संकट जगावरून लवकर जाऊ दे, अशी आराधना करण्यात येत आहे. 

विदर्भाचे कुलदैवत व लाखो भाविकांच्या हृदयी वसलेल्या अंबा तसेच एकवीरा देवीचे मंदिरसुद्धा लॉकडाउनमुळे बंद करण्यात आले आहे. कोरोनासारख्या महामारीला हरविण्यासाठी भाविकांनीसुद्धा मोठ्या मनाने कंबर कसली आहे. अंबा आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद असले तरी या मार्गावरून अत्यावश्‍यक कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक देवीच्या उंबऱ्यावर आपला माथा टेकविल्याशिवाय समोर जात नाहीत. 

सध्या ही दोन्ही प्रमुख मंदिरे भाविकांसाठी बंद असली तरी मंदिराच्या आतमध्ये देवीची नित्योपासना पुजाऱ्यांकडून सुरू आहे. दररोज पहाटेची आरती, दुपारची नैवेद्य आरती, त्यानंतरचा नैवेद्य विधी तसेच सायंकाळची आरती पुजाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, नेहमी मंहिरात राहणारी गर्दी, भाविकांचा उत्साह हे सध्या बघायला मिळत नसल्याने आम्हीसुद्धा कोरोनाचे संकट लवकरात लवकर निवळू दे, अशीच प्रार्थना करीत असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. 


देवीची नित्योपासना तसेच पूजाविधी नित्यनेमाने करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनासुद्धा शिफ्टमध्ये बोलावून सोशल डिस्टन्सिंग साधण्यात येत आहे. 
- डॉ. अतुल आळशी, पदाधिकारी, अंबादेवी संस्थान, अमरावती. 

उत्सव नाहीत 
मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्री व श्रीराम नवमी असे दोन मोठे उत्सव होत असतात. यंदा प्रथमच हे दोन्ही उत्सव साजरे झाले नाहीत. भाविकांसाठी मंदिर बंद असून मंदिरातील पुजाऱ्यांकडून पूजाविधी पार पाडण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT