Amravati primary health centers 
विदर्भ

अमरावती : प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील भार वाढला

सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ

मोहन गायन

जामली : वातावरणातील बदलामुळे सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णसंख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील भार वाढला आहे. अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रूसोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसंख्या वाढलेली आहे. यात सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. टेम्ब्रूसोडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२ उपकेंद्रे असून ३८ गावांचा समावेश आहे. ३८ गावांची लोकसंख्या ४० हजारांच्या आसपास असून याचा डोलारा प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळत आहे. पण, उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी हे गैरहजर राहत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्रावरील भार वाढलेला आहे.

जामली आर, अंबापाटी, खटकाली येथील सामुदायिक आरोग्य अधिकारीसुद्धा सतत गैरहजर राहत असल्याची ओरड आहे. तर काही ठिकाणी सामुदायिक आरोग्य अधिकारी येतात व एक तास दवाखान्यात थांबून निघून जातात. जामली आर येथील डॉक्टर हे दोन महिन्यांपासून सतत गायब आहेत. त्यामुळे उपचारासाठी गावातील व आश्रमशाळेतील मुलांना दररोज १० किलोमीटरवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा व सोबत असलेल्या शिक्षकांचा वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंडसुद्धा बसत आहे.

अमरावती जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्यकेंद्रे असून आयुर्वेदिक दवाखान्यांची संख्या ६५ आहे. १८ अ‍ॅलोपॅथिक रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, १४ ग्रामीण रुग्णालये, ३४१ आरोग्य उपकेंद्र असा आरोग्ययंत्रणेचा पसारा आहे. त्याचप्रमाणे मेळघाट विभागात बालविकास योजनेची ९५ उपकेंद्रे असून धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत ८ प्राथमिक आरोग्य पथके आहेत.

शासकीय आश्रमशाळेतील रुग्णवाहिका बंद

शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळा येथील रुग्णवाहिका एका वर्षापासून बंद आहे. रात्रीच्या वेळेस मुले सहसा आजारी पडतात. त्यांना ने-आण करण्याची आश्रमशाळांकडे सद्यःस्थितीत कुठलीच सुविधा उपलब्ध नाही, हे विशेष.

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

बहुतेक ठिकाणी रिक्त पदांची ओरड असून काही ठिकाणी कर्मचारी असतानाही ते गैरहजर राहत असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे साथीच्या दिवसात तरी सर्व कर्मचारी नियोजित ठिकाणी उपस्थित राहतील, यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT