अमरावतीत खासगी रुग्णालयही ठरले कोरोनाचे हॉटस्पॉट, तीन रुग्ण पॉझिटिव्ह  
विदर्भ

अमरावतीत खासगी रुग्णालयही ठरले कोरोनाचे हॉटस्पॉट, तीन रुग्ण पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य वस्ती आणि कोविड रुग्णालयापाठोपाठ आता खासगी रुग्णालयाकडे वळलेला दिसत आहे. आरोग्य यंत्रणेच्या समस्येत ही बाब भर टाकणारी आहे. स्थानिक रुक्‍मिणीनगर येथील एका खासगी रुग्णालयात भरती असलेली मुलगी, मुलीचे 52 वर्षीय पिता आणि पत्नी असे तिघेजण कोरोनाबाधित आढळले आहेत.
संबंधित 52 वर्षीय व्यक्ती (रा. वायगाव) जिल्हा मलेरिया कार्यालयात बहूद्देशीय वैद्यकीय कर्मचारी (एमपीडब्ल्यू) म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक रुक्‍मिणीनगरातील एका खासगी रुग्णालयात त्यांची मुलगी पंधरवड्यापासून उपचारार्थ दाखल आहे. संबंधित कर्मचाऱ्याच्या मुलीची प्रकृती चांगली असल्याने तिच्याजवळ थांबण्याची गरज नाही, अशी सूचना रुग्णालयातर्फे त्यांना करण्यात आली होती. पोटच्या गोळ्यात जीव गुंतलेला असल्याने कर्मचारी व कुटुंबाने त्या सूचनेकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि ते रुग्णालयातच थांबले.

या रुग्णालयातील सारीच्या एका रुग्णाला नागपूर येथे नुकतेच हलविले. तेथेच त्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गुरुवारी मृत्यू झाला. यापूर्वी या रुग्णालयातील परिचारिका कोरोनाबाधित आढळल्याने रुग्णालयातील इतर व्यक्तींचे थ्रोट स्वब घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यात संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचा आणि त्याची मुलगी (वय 21) आणि पत्नी (वय 44) यांचाही कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (ता. पाच) पॉझिटिव्ह आल्याने संबंधितांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेवरून तसेच सामाजिक जबाबदारी ओळखून स्वॅब दिले होते. संबंधित कर्मचारी 15 दिवसांपासून मुलीच्या सुशृषेत होता. तो परवानगीने कार्यालयात आलेला नाही, असे जिल्हा मलेरिया अधिकारी हरीष कुंडे यांनी सांगितले.

शहराच्या विविध भागांत आतापर्यंत कोरोनाबाधित आढळत होते. एवढेच नव्हे तर जिल्हा कोविड रुग्णालयात सेवारत डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला. नागरिकांच्या सोयीसाठी खासगी रुग्णालये सुरू राहावीत, असा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असतानाच आता या संसर्गाचे लोण खासगी रुग्णालयात पोहोचले आहे. ही बाब यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT