Amravati Rain Updates esakal
विदर्भ

Amravati Rain Updates : अमरावतीत पाऊस थांबेना! अंबा नाल्यात चौदा वर्षीय मुलगा वाहून गेला; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

१४ वर्षीय परवेज खान अफरोज खान असं पुरात वाहून गेलेल्या बालकाचं नाव आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झालं असून नाल्यानजीक खेळायला गेलेला बालक अचानक नाल्यात पडला व तो वाहून गेला. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संतोष कानडे

Monsoon Alert : अमरावती जिल्ह्यात आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरुच आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत.

दुसरीकडे अमरावती शहरातील लालखडी परिसरातील अंबा नाल्यात एक मुलगा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे अमरावतीमधील अंबा नाल्याला पूर आल्याने ही दुर्घटना घडली.

१४ वर्षीय परवेज खान अफरोज खान असं पुरात वाहून गेलेल्या बालकाचं नाव आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झालं असून नाल्यानजीक खेळायला गेलेला बालक अचानक नाल्यात पडला व तो वाहून गेला. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अमरावती जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. पूर्णानगर भागत शेकडोहेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कपाशीसह तूर पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेक भागात पिकांना नवसंजीवनी तर दुसरीकडे पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

रविवारी (दि. १४ जुलै) रात्री राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड धाराशिवा, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT