rafale plane esakal
विदर्भ

Nitin Gadkari : ‘मिहान’मध्ये होणार राफेल विमानांची निर्मिती

भारत आज सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनला असून नागपुरातील मिहानमध्ये जगातील सर्वाधिक शक्तिशाली म्हणून ओळख असलेल्या राफेल विमानांची निर्मिती केली जाणार.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - भारत आज सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनला असून नागपुरातील मिहानमध्ये जगातील सर्वाधिक शक्तिशाली म्हणून ओळख असलेल्या राफेल विमानांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता.२८) अमरावती येथे दिली.

शासकीय ज्ञान विदर्भ संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, विदर्भाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या मिहान प्रकल्पामध्ये आज देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित कंपन्या सुरू झाल्या असून त्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले आहे. बोइंग, एअरबस सारख्या हेवीवेट कंपन्यासुद्धा याठिकाणी आहेत. भविष्यात लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा हा आमचा संकल्प आहे.

विदर्भात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच कापूस निर्यातीला भरपूर वाव आहे. बांगलादेश हा कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे, कारण बांगलादेशात कापूस होत नसल्याने विदर्भातून निर्यात होणाऱ्या कापसाला चांगला भाव मिळतो आहे.

ही गरज ओळखून सिंदी येथून हल्दिया येथे कंटेनरव्दारे कापूस निर्यातीची सोय करण्यात आली आहे. येथून नदीमार्गाने तो बांगलादेशात पोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे.

जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येत असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT