Amravati second tree planting in state
Amravati second tree planting in state 
विदर्भ

वृक्षलागवडीत अमरावती राज्यात दुसऱ्या स्थानी 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  - 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत अमरावती विभागाने वृक्षलागवडीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले. विभागात आतापर्यंत 3.45 कोटी (78.78 टक्के) वृक्षलागवड करण्यात आली. वृक्षलागवडीला आणखी चाळीस दिवसांचा अवधी असल्याने लक्ष्यांकापेक्षा अधिक वृक्षलागवड होण्याची चिन्हे आहेत. 

33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत पहिल्या स्थानी नाशिक महसूल विभाग आहे. कोकण, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद विभाग अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत. अमरावती विभागाला 4.38 कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्यांक देण्यात आले होते. जूनमध्ये पावसाअभावी वृक्षलागवड खोळंबली होती. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक बरसल्याने वृक्षलागवडीला गती देण्यात आली. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी 4.68 कोटी वृक्षलागवडीचे म्हणजेच लक्ष्यांकापेक्षा 30 लाख अधिक वृक्षलागवडीचे नियोजन केले. या नियोजनात यवतमाळचे लक्ष्यांक 1.50 लाखांनी घटविण्यात आले. 

वृक्षलागवडीसाठी विभागात 4.43 कोटी खड्डे खोदण्यात आले होते. विभागात 16 ऑगस्टपर्यंत 3.45 कोटी वृक्षलागवड करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली. 

या मोहिमेत एकूण 57 शासकीय विभाग सहभागी करण्यात आलेत. त्यापैकी आठ विभागांना लक्ष्यांक नाही, तथापि नियोजनात त्यांना 16 लाख वृक्षलागवडीचे लक्ष्यांक देण्यात आले. ग्रामपंचायत, कृषी, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, औद्योगिक, जलसंधारण, आदिवासी विकास, महसूल, गृह, क्रीडा, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, सहकार व पणन, अल्पसंख्याक कल्याण, सामाजिक न्याय, विधी व न्याय, पाणीपुरवठा, कारागृह, कौशल्य विकास, राष्ट्रीय महामार्ग, उच्च शिक्षण विभागाची वृक्षलागवड इतर विभागांच्या तुलनेत कमी आहे. 

विभागनिहाय वृक्षलागवड व टक्केवारी 
नाशिक - 4,75,69,029 - 81.15 टक्के 
अमरावती - 3,45,09,144 - 78.76 टक्के 
कोकण - 2,63,90,404 - 78.73 टक्के 
नागपूर - 4,62,90,374 - 76.04 टक्के 
पुणे - 3,93,34,910 - 71.86 टक्के 
औरंगाबाद - 6,49,67,786 - 69.94 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT