Amravati 
विदर्भ

अमरावतीत शिवरायांच्या पुतळ्यावरून शिवप्रेमी आक्रमक; आयुक्तांवर फेकली शाई

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

अमरावती - अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज झाले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे. राजापेठ उड्डाणपुलावर ही घटना घडली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी शाई फेकली आहे. याप्रकरणी काही शिवप्रेमी महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा महानगरपालिकेने काही काळाने हटवला. त्यानंतर परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. हा पुतळा हटवू नये अशी मागणी काही संघटनांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT