Amravati thirteen villages street lights off sakal
विदर्भ

अमरावती : तेरा गावांतील पथदिव्यांची बत्ती गुल

ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जिवावर

मोहन गायन

जामली : चिखलदरा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींनी वीजबिल न भरल्यामुळे गावातील पथदिवे बंद राहत असून ग्रामपंचायतींचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर उठला आहे. ग्रामपंचायतला येणारे वीजबिल आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात होते. पण, आता १ एप्रिल २०२१ पासून जिल्हा परिषदेने आपले हात आवरले असून येणारे विद्युत बिल ग्रामपंचायतीनेच भरावे, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींकडे वीज वितरण कंपनीचे लाखोंचे बिल थकीत आहे. त्यामुळे आधी वीजबिल भरा, मगच लाइन वापरा, अशी ताकीद महावितरणकडून देण्यात आली असून गौलखेडाबाजार फीडरअंतर्गत येणाऱ्या तेरा गावांत वीजबिल न भरल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. सर्व जिवजंतू जमिनीबाहेर बिळातून निघत आहेत. जामली, चिचखेडा, टेम्ब्रूसोडा, चांदपूर, धर्मडोह, बहादरपूर, सती, वाकी आदी गावांतील पथदिवे बंद असल्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. अशातच जंगलातील हिंस्र पशू हे गावाकडे धाव घेतच आहेत. त्यामुळे बऱ्याच पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. त्याकरिता ग्रामपंचायतींनी आपल्या येणाऱ्या मिळकतीतून वीजबिल भरावे व जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी गावांतील नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT